करोना हरणार....देश जिंकणार...

-----------------------------------------------------------------------  
                 - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर (प्रतिनिधी) :
  रा.स्व. संघ व अमळनेर केअर टेकर मार्फत नाविन्य पुर्ण उपक्रम

जे जनतेचं संरक्षण करत आहेत त्यांच्या संरक्षणाची घेतली काळजी त्यात
प्रांत,तहसीलदार,पोलीस प्रशासन,सरकारी डॉक्टर्स,स्टाफ,खाजगी डॉक्टर्स,स्टाफ,पत्रकार बांधव इ.देण्यात येत आहेत.

           कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर निघतांना चेह-यावर मास्क लावण्याचे आवाहन सर्व स्तरातून करण्यात येत आहे. नागरिकही कापडी मास्क अथवा रूमालाचा वापर करीत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अमळनेर केअर टेकर गृपने सुरक्षित असे फेस प्रोटेक्शन मास्क बनविले आहेत. हे मास्क डॉक्टर्स,आरोग्य सेवक,पोलीस कर्मचारी,पत्रकार व आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे घटक यांना देण्यात आले आहेत.
       कोरोना रोखणे हे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर  उभे राहिले आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी व्यवस्थित पार पाडण्यासाठी व काही आरोग्य विषयक सुविधा देण्यासाठी या यंत्रणेस नेहमी तयार रहावे लागते. यात एखाद्या प्रसंगात या सेवा देणा-या घटकांना सुरक्षा बाळगणे आवश्यक ठरते. याचा विचार करून रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांनी सुरक्षित असे फेस प्रोटेक्शन मास्क तयार करण्याची कल्पना मांडली व अमळनेर केअर टेकर गृपच्या संयुक्तपणे ही कल्पना अस्तित्वात आणली. आतापर्यंत १०० मास्क तयार करण्यात आले असून अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी वर्गास वाटप करण्यात आले आहेत.
अजून १०० मास्क तयार करण्याची योजना असून त्यानुसार काम सुरू आहे.  मास्क तयार करतांना स्वत: मास्क लावणे व सोशल डिस्टन्सींगचा नियम  पूर्णपणे पाळण्यात येत आहे. मास्क बनविण्याच्या या उपक्रमात......
या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
डॉ. चंद्रकांत पाटील,विजय पाटील,संकल्प वैद्य,हितेश शहा,संदीप सोनवणे,विलास चौधरी,देवेंद्र परदेशी,पप्पु परदेशी,सौरभ उपासनी,महेंद्र पाटील,हरीश देशमुख,विजेंद्र शिरसाळे,प्रदीप कंखरे,कल्पेश पाटील,अभिषेक पाटील,संदीप अहिरराव,शैलेश पाटील,प्रवीण वानखेडे,राजेंद्र पाटील,नयन पाटील इ.
काळजी घ्या...घरी राहा...सुरक्षित राहा...
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.