----------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष अमोल माळी,मा.सरपंच तथा मुख्याध्यापक एस.बी.बैसाने,प्रा. भीमराव महाजन,शहराध्यक्ष प्रताप पाटील,महेश पाटील,मनोज बि-हाडे उपस्थित होते. समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी जयंती साजरी करताना बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या कायद्याचा सन्मान म्हणुन घरातच पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.बाबासाहेबांचे विचार समता परीषदेतर्फे समाजात तळागाळापर्यंत पोहोचवणार असल्याचे तालुकाध्यक्ष अमोल माळी यांनी सांगितले .



