----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना (कोविड १९) या साथ रोगाच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी भारत सरकारने दि. ३ मे २०२० पर्यंत संपुर्ण भारत लाॅकडाऊन केला असुन अमळनेर नपाचे सफाई कामगार मात्र स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालुन एखाद्या योद्ध्य सारखे शहरातील रोगराई व घाणीच्या साम्राज्याशी दोन हात करीत आहेत.या लढवय्या ३७५ सफाई कामगारांना आज दि.१४ एप्रिल २०२० रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे अौचित्य साधुन प्रत्येकी ६५०/- रुपये भेट देण्याचा कौतुकास्पद निर्णय अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील ,मुख्याधिकारी सौ.विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी श्री.संदिप गायकवाड व इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने घेतला.याकरीता नगरपरिषदेचे एकुण २०० अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार २ लाख २७ हजार रुपये व नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांनी पुर्ण एक महिन्याचे मानधन २०,००० रुपये असे एकुण २ लाख ४७ हजार रुपये दिले.

सदर भेट वाटप उपक्रमाची प्रातिनिधीक स्वरुपात सुरुवात महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने माजी आमदारकृषिभूषण साहेबराव पाटील,दलित नेते रामभाऊ संदानशिव,नगरसेवक नरेंद्र संदानशिव,शेखा हाजी मिस्तरी,सोमचंद संदानशिव,जगदिश ठाकरे, गोल्डी भाऊ व काही समाज बांधवांनी सामाजिक अंतर राखत केले.
सदर उपक्रमाचे व नगराध्यक्षा ,अधिकारी व कर्मचारी बंधु - भगिनींच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




