कोरोनाच्या रूग्णसेवेसाठी कोठेही जाण्याची तयारी माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील यांची शासनास विनंती

-------------------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर -
स्वतःचा  दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी कुठेही जाण्याची तयारी अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी दर्शवली आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी घटकांना केलेल्या विनंती नुसार माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील ह्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ई -मेल पत्त्यावर (कोविडयोध्दा @जी मेल डॉट कॉम ) आपले नाव नोंदविले आहे . तसेच शासनाच्या आदेशानुसार आपला स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी एक अनुभवी डॉक्टर म्हणून राज्यांत कुठेही जाण्याची तयारी दर्शविली आहे.
    याआधीही मा.आ.डॉ.पाटील यांनी कोरोनाच्या निर्मुलनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपये निधी दिला आहे.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.