--------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अमळनेर - एप्रिल महिन्याचे दोन आठवडे उलटले असुन तापमानात वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी पाऊस चांगला झाला असला तरी पारोळा तालुक्यातील काही गांवांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गत आठवड्यात या संभाव्य अडचणींवर मात करण्यासाठी विधान परिषद सदस्या आमदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना भेटून या संदर्भात चर्चा केली होती. त्यासंदर्भात आज आमदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी पारोळा तहसील कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला.तसेच तहसीलदार पाडवी यांना ज्या गावांना पाणी टंचाई आहे अशा गावांचे विहीर अधिग्रहण व विंधन विहिरी प्रस्ताव तयार करुन तातडीने जिल्हा कार्यालयाला पाठवावे असे आदेश दिले. याप्रसंगी वडगाव सरपंच व अन्य कार्यकर्ते उपस्थीत होते.




