कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळ ग्रह सेवा संस्थेकडून १ लाख ५२ हजारांची मदत

अमळनेर-
येथील सुप्रसिद्ध  मंगळ ग्रह सेवा संस्थेनेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत १ लाख ५२ हजार रुपयांचे योगदान दिले आहे. कोरोना आजाराच्या या संकटमय काळात देशातील सर्वच लहान-मोठ्या मंदीर देवस्थानांनी जनतेच्या हितासाठी आपले योगदान दिले आहे. त्यात मंगळ ग्रह सेवा संस्थेनेही योगदान दिले आहे.   
पीएम-सीएम सहायता निधीसही मदत
मंगळ ग्रह सेवा संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ हजार रूपयांचा धनादेश तहसीलदार मिलिंद वाघ यांना सुपूर्द केला.
तर पंतप्रधान सहायता निधीसाठी २१ हजार रूपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे सुपूर्द केला. तसेच  शहरातील भानुबेन गोशाळेच्या माध्यमातून गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानाचा एक दिवसांचा खर्च १ लाख १० हजार रुपये गोशाळेचे सचिव चेतन शाह ,प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, राजू सेठ यांना सुपूर्द केला.यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम उपस्थित होते.याशिवाय मोठ्या संख्येने सॅनिटायझर्स व मास्कचेही मोफत वितरण संस्थेने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.