अमळनेर - येथील कोरोना बाधित ६६ वर्षीय वृध्दाचा काल रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगाव येथील कोरोना रुग्णालयात मृत्यू झाला. या वृध्दास दि. २४ एप्रिलला कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
अमळनेर शहरातील
शाहआलम नगर मधील हा दुसरा तर शहरातील कोरोनाचा हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे पाच बळी गेले आहेत. अमळनेर येथील मृत वृध्दाला हृदयविकाराचा आजार होता. जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण १८ कोरोनाबाधित रुग्णापैकी एकट्या अमळनेरातील १३ रुग्ण आहेत.त्यामुळे अमळनेर तालुका कोरोना आजाराचा हॉटस्पॉट बनला आहे.
