अमळनेर - शहर व तालुक्याच्या आर्थिक विकासाचा कणा असलेल्या अर्बन बँकेने कोरोनाच्या आजाराशी लढण्यासाठी मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून ११ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे देण्यात आला.
यावेळी आमदार अनिल भाईदास पाटील,तहसीलदार मिलिंद वाघ ,सहाययक निबंधक गुलाबराव पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा,व्हॉईस चेअरमन प्रवीण जैन, संचालक शांताराम ठाकूर,अभिषेकपाटील,
व्यवस्थापक अमृत पाटील, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,डॉ दिलीप पोटोडे हजर होते यापूर्वी देखील अर्बन बँकेने पंतप्रधान मदत निधीला २१ हजार रुपयांची मदत केली आहे. तर कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार अकरा हजार रुपये मुख्यमंत्री निधीसाठी दिला आहे. अर्बन बँकेने एकूण ४३ हजार रुपये कोरोनाच्या लढ्यासाठी शासनाला दिले आहेत. तसेच शहरातील कुंटे रोडवर पन्नालाल चौकात निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची निर्मिती बॅकेने तज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
