अमळनेर - येथील पत्रकार प्रा.जयश्री दाभाडे साळुंके यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल मिशनच्या वतीने "देवदूत" डिजीटल प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले आहे व आभार मानण्यात आले आहेत. प्रा.दाभाडे या ६ वर्षां पासून पत्रकारिता करीत असताना विविध प्रकारचे विषय हाताळून सामाजिक,सांस्कृतिक, ऐतिहासिक,धार्मिक,राजकीय,महिला समस्या यावर रोख ठोक लिखाण करीत आहेत. प्रा.जयश्री दाभाडे-साळुंखे या कोरोनाच्या या संकटात सकाळ पासूनच सर्वत्र स्वतः कुठे काय घडतेय याचा आढावा घेण्यासाठी निघतात. दुपारचे जेवण सुद्धा होतच नाही सरळ सायंकाळी जेवण करतात . सातत्याने फिल्ड वर्क करत शासकीय अधिकारी यांना माहिती पुरवीत आहे. प्रा.जयश्री दाभाडे साळुंखे या अथक परिश्रमातून लॉक डाऊन मध्ये अमळनेर परिसरातील माहिती इलेक्ट्रॉनिक मीडिया ठोस प्रहार न्यूज पोर्टल द्वारे सर्वांपर्येंत पोहचत आहेत.
प्रा.दाभाडे या ठोस प्रहार न्युज पोर्टल व न्युज चॅनलच्या प्रमुख संपादक आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने देवदूत प्रा. जयश्री दाभाडे साळुंखे यांच्या सन्मान व आभारासाठी डिजिटल आभार पत्र पाठविले आहे. कोरोना संकट दूर झाल्यावर नासिक येथे कलाम कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे त्यांचे मनापासून अभिनंदन.
