अमळनेरात आज पोलीस कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या नियोजनात संपन्न झाला उपक्रम उद्या दि.५ रोजी सायंकाळी पत्रकारांची आरोग्य तपासणी

-----------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर -
शहर व तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात बंदोबस्तासाठी असलेल्या सर्व पोलीस कर्मचा-यांची आज दि. ४ मे रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तपासणी शिबिराचे नियोजन येथील पोलीस ग्राउंड येथे करण्यात आले होते.
           येथील साई सेवा हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत शिंदे (एमडी मेडिसिन) यांनी ५ अधिकारी व ६५ कर्मचारी यांची मोफत वैद्यकीय तपासणी केली. 
या वैद्यकीय तपासणीचे नियोजन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व गोपनीय शाखेचे शरद पाटील यांनी केले होते. त्यांनी डॉ.प्रशांत शिंदे यांचे विशेष आभार मानले व त्यांनी यापुढेही असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजनात सपोनि एकनाथ ढोबळे,सपोनि प्रकाश सदगीर,पीएसआय राजेंद्र माळी,पीएसआय गणेश सूर्यवंशी,दिपक माळी,रवींद्र पाटील,हितेश चिंचोरे,योगेश महाजन,हजेरी मास्टर संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
आज पत्रकारांची वैद्यकीय तपासणी
        आज दि. ५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिस ग्राउंड येथे पत्रकार बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,गोपनीय शाखेचे पोलीस नाईक शरद पाटील व डॉ.प्रशांत शिंदे यांनी संयुक्तपणे  हे शिबिर आयोजित केले आहे. डॉ.प्रशांत शिंदे हे तपासणीसाठी उपस्थित रहाणार आहेत. तरी पत्रकार बांधवांनी या शिबिरात उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.