आ.स्मिताताई वाघ यांची शहरातील कोविड सेंटरला भेट रूग्ण व डॉक्टरांशी चर्चेतून ऐकल्या समस्या,प्रशासनास दिल्या सुचना रूग्णांनी व्यक्त केल्या मनातील भावना,रूग्णांचे मनोबल वाढविणारी भेट

------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - 
शहरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आल्याने आ.स्मिताताई वाघ यांनी  सोमवारी सायंकाळी थेट या सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली .कोरोना आजाराची मनात दहशत असल्याने कोणीही पुढारी वा अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहचत नव्हते.पण आमदार स्मिताताई वाघ तेथे पोहचल्याने रुग्णांनीही मोठ्या अपेक्षेने त्यांना पाहून आपल्या मनातील भावना आणि समस्या व्यक्त केल्या.त्यानंतर आ.वाघ यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सुविधा रुग्णांना पुरविण्याच्या सूचना दिल्या. तेथील डॉक्टर्स व  अधिकारी वर्गाशी त्यांनी चर्चा केली. रूग्णांचे मनोबल वाढविणारी ही भेट ठरली.
         अमळनेर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . शंभरावर रुग्ण संख्या पोहोचली असून कॉरेन्टाईन रूग्णांची   संख्या मोठी आहे. त्यांना शहरातील कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचार सुरू आहेत . या सेंटरमध्ये रुग्णांना कोणत्याही आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आमदार स्मिता वाघ यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना नसते कागदी घोडे नाचवणे बंद करून उपाययोजना करण्याचे सांगितले होते. तरीही त्यांच्याकडे तक्रारी येत राहिल्याने अखेर सोमवारी सायंकाळी त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ,डॉ. प्रकाश ताडे,डॉ. संदीप जोशी,भाजपा सरचिटणीस राकेश पाटील,राहुल चौधरी यांच्या सोबत कोविड सेंटरला भेट दिली.
रूग्णांशी केली चर्चा
           यावेळी त्यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या .कोरोना सारख्या या जीवघेण्या संसर्गाला न घाबरता जनतेसाठी नि:स्वार्थ धडपड करणाऱ्या स्मिता वाघ यांच्या सारख्या नेत्याची समाजाला  नक्कीच गरज आहे अशा भावना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.
रूग्णांना दिला विश्वास
   आमदार स्मिताताई यांनी पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांची नुसती विचारपूस न करता समुपदेशनही केले.कोरोनावर आपण नक्कीच विजय प्राप्त कराल असा विश्वास आ.वाघ यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. वैद्यकीय व प्रशासनातील अधिकारीही ज्या कोविड सेंटरला जाण्यास धजत नाहीत अशा ठिकाणी आमदार स्मिताताई वाघ अचानक पोहचल्याने रुग्णांनी त्यांचे कौतुक करत अशा या जिगरबाज लोकप्रतिनिधीला त्यांनी सलाम केला आहे .
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.