मारवड पोलीसांची शेतातील अवैध जुगार अड्डयावर कारवाई आरोपींसह रोख रक्कम व जुगार साहित्य ताब्यात,गुन्हा दाखल

--------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  तालुक्यातील मारवड येथे शेतात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जुगार खेळणा-यांवर मारवड पोलीसांनी पं.स.चे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज छापा टाकून कारवाई केली आहे. यात २८ हजार ७८४ रुपये इतकी रोख रक्कम व जुगार साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. 
      या बाबतची अधिक माहिती अशी की,मारवड येथील देवीदास पाटील हे जुपने करीत असलेल्या रमेश पाटील यांच्या शेतात गजानन पवार,राजेंद्र भदाणे,वासुदेव मारवडकर, घनश्याम बडगुजर, शब्बीर खाटीक,अनिल पाटील, बाळासाहेब साळुंखे, पंकज लोहार हे कोरोना साथ रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असतांना, मास्क, रुमाल किंवा कपडा वगैरे न बांधता व अत्यावश्यक कारण वगळता विनाकारण न फिरण्याचे आदेश असतांनाही शेतात सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्या सर्वांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधात्मक कायदा क्र.१२(अ),भादंवि कलम १८८, २६९ साथ रोग प्रतिबंध कायदा कलम २,३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच घटनास्थळावरून जुगार साहित्य व रोख रक्कम रूपये २८,७८४ /- जप्त करण्यात आले आहेत.पुढील तपास मारवड बीटचे सपोनि श्री शिंदे व मुकेश साळुंखे हे करीत आहे.
----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.