लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अक्षय साळी यांनी साधेपणाने साजरा केला वाढदिवस पैलाड भागातील गरजूंना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

----------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  शहरात कोरोनाचे  थैमान सुरू आहे. गेल्या दीड महिन्यापासून सर्व व्यवसाय व रोजगार बंद असल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा न करता गरीब व गरजू नागरिकांना  धान्य वाटप करून अक्षय (मॉन्टी) साळी याने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. अक्षय हा येथील भद्रा प्रतिक मॉलचे प्रोप्रायटर  माजी नगरसेवक प्रताप साळी यांचा लहान मुलगा व अर्बन बॅंकेचे विद्यमान संचालक दीपक  साळी यांचा पुतण्या आहे.
१११ गरीब कुटुंबांना मदत
 
        लॉकडाऊन कालावधीत अनेक परिवाराचा रोजगार बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहीले होते. अशा गरीब व गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी अक्षयने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आपले मित्रांसह पैलाड भागातील मातंग वाडा व भिल्ल वस्ती येथे जाऊन १११ कुटुंबांना गहू,तांदूळ,साबण,मास्क आदी जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले होते. 
या मित्रांची होती उपस्थिती
        यावेळी चंद्रमणी संदानशिव,
निखिल चौधरी,दादु पाटील,ऋषभ जैन,अजय महाजन, सचिन भोई,अजय नेतकर, प्रकाश बि-हाडे,गौरव पाटील, शुभम पाटील,पिंटू या मित्रांची उपस्थिती होती. अक्षय साळी याने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.