--------------------------------------------------------------------------
अमळनेर - अखिल भारतीय वारकरी मंडळ तालुका अमळनेरच्या कोषाध्यक्षपदी ह.भ.प.डॉ. दत्ता महाराज ठाकरे वावडेकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी ही निवड केली आहे. सदर निवडीबद्दल वारकरी मंडळाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. भरत महाराज म्हैसवाडी,जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प. मुकेश महाराज पारगावकर,तसेच अमळनेर तालुकाध्यक्ष ह.भ.प. ऊमेश महाराज दहिवदकर,उपाध्यक्ष ह.भ.प.पंकज महाराज एकतासकर,सचिव ह.भ.प. राहुल महाराज शिरसाळेकर तसेच परिसरातील सर्व वारकरी मंडळी यांनी डॉ.ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून महाराजांचे अभिनंदन होत आहे.




