निराधारांना आधार देणे हाच प्रामाणिक हेतू-आ.अनिल पाटील राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना धनादेशाचे वितरण तर इतर योजना प्रस्तावांना मंजुरी

------------------------------------------------------------------------------
             - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेच्या १२  लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेशाचे वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर संजय गांधी योजना (१४७),श्रावणबाळ योजना (३८७), व इंदिरा गांधी योजना (९१), अशा योजनांचे एकूण ६२५ प्रकरणे मंजूर करण्यात आली. यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ,संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार योगेश पवार,अव्वल कारकुन संगिता घोंगडे,लिपीक संजय ब्राम्हणे व पदाधिकारी आदींची  उपस्थिती होती. 
    गोरगरिबांना आधार देणारा हा विषय असल्याने अपघाती अथवा नैसर्गिकरित्या कुटुंबप्रमुख मृत झालेल्या लाभार्थी असलेल्याना आधार मिळावा हाच आपला प्रामाणिक हेतू आहे.
      *-आ.अनिल पाटील*
यांना केले धनादेशाचे वाटप
      राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेत कुटुंब प्रमुख मृत झालेल्या १२  महिलांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे २ लाख ४० हजारांच्या रक्कमेचे धनादेश वितरण करण्यात आले. त्यात शालुबाई गोविंदा वानखेडे,लताबाई अर्जुन धनगर,सुरेखा नाना शेटे,भुराबाई अशोक साळुंखे,साधना चंद्रकांत गीते,प्रमिला अशोक चौधरी ( सर्व अमळनेर),तुळसाबाई साहेबराव महाले (जुनोने), मनीषा बापू पारधी (जानवे), शांताबाई जंगलु भील (बोरगाव) मायाबाई मंगा भिल (बोरगाव), मंगलबाई सुक्राम भिल (पळासदळे), आशाबाई अनिल मस्के (पिंपळे),  या सर्व लाभार्थ्यांना हे धनादेश वितरण करण्यात आले.
---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.