--------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - मागील दोन महिन्यांपासून कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देणारे नगरपालिकेचे अधिकारी,सफाई आणि कार्यालयीन कर्मचारी अशा ५५५ कर्मचाऱ्यांची नगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली व नगरपरिषदेने प्रत्येकाला सुरक्षेसाठी सॅनिटायजरचे वाटप केले शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानी सर्वेक्षण ,बॅरीकेट्स लावणे ,भाजीपाला लिलावाची व्यवस्था करणे,सफाई करणे , फवारणी करणे,धोकेदायक कंटेन्मेंट झोन मध्ये सेवा देणे आदी कामे केल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात आली होती. म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून त्यांची स्क्रीनिंग करून इतरही आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले.

तपासणी कार्यात सहभागी डॉक्टर्स

नपाच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी केलेल्या विनंती नुसार डॉ. संदीप जोशी ,डॉ.अविनाश जोशी,डॉ. निखिल बहुगुणे,डॉ. नितीन पाटील,डॉ. प्रशांत शिंदे ,डॉ. विलास महाजन,डॉ. राजेंद्र शेलकर या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी नपाच्या ५५५ कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले व उपचारही करण्यात आले. नगरपालिका कार्यालयात ही तपासणी करण्यात आली. प्रत्येकाला सॅनिटायझर वाटप केले.

यांचे लाभले सहकार्य
यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील,मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड ,संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण,संतोष बिऱ्हाडे,सोमचंद संदानशिव,महेश जोशी,प्रसाद शर्मा यांचे सहकार्य लाभले
No comments
Post a Comment