अखेर अमळनेर येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्र व कृषी उपन्न बाजार समिती आजपासून होणार सुरु - आ. स्मिता वाघ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोंदणी नुसार कापूस खरेदी तर बाजार समितीत सोशल डिस्टन्सींगचे पालन - सभापती प्रफुल्ल पवार

-----------------------------------------------------------------------------
              - * जाहीरात * -
----------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेली अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी अखेर आज दिनांक १८  (सोमवार) पासून सुरु होणार आहे. नोंदणी केलेल्या कापूस उत्पादकांना कृषी उपन्न बाजार समिती मार्फत नोंदणी क्रमांक नुसार कळविण्यात येणार आहे.
             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंद असलेली शासकिय कापूस खरेदी केंद्र सुरु होण्यासाठी राज्याचे पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांच्या समवेत आ.स्मिता वाघ यांनी चर्चा केली होती. त्यानंतर कापूस खरेदी केंद्र चालु करण्यात येणार होते.परंतु अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्ण संख्या शंभरीपार गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सदर केंद्र विशेष शासकीय आदेशा अन्वये बंद करण्यात आले होते.सदयस्थितित कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असून आगामी हंगाम जवळ आल्याने कापूस खरेदी केंद्र सुरु होणे अत्यंत गरजेचे होते. त्यानुसार आ.स्मिता वाघ यांनी जिल्ह्याधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांची भेट घेवून कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली त्यानुसार अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र व कृषी उपन्न बाजार समिती आज दिनांक १८ (सोमवार) पासून सुरु होणार आहे.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दिवभरात २० वाहनांची मोजणी केली जाणार असून संबधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उपन्न बाजार समिती मार्फत कळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वाहन आल्यास त्याची मोजणी केली जाणार नाही असे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाने केले आहे.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.