मारवड पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

Thursday, May 7, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -  कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस कर्मचा-यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. 
      जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे  यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड १९ अनुषंगाने वैद्यकीय तपासणी शिबीराचे नियोजन सपोनि राहुल फुला व पो.ना. फिरोज बागवान यांनी केले होते. अमळनेर येथील साई सेवा हॉस्पिटलचे डाॅ. प्रशांत शिंदे यांनी एकुण तीन अधिकारी, २१ कर्मचारी यांची कोविड-१९ या साथ रोगाच्या अनुषंगाने प्राथमिक वैद्यकीय तपासणी केली.
तसेच कर्मचाऱ्यांचे वय व विविध आजार जाणुन घेत पोलीस कर्तव्य बजावत असतांना व घरी येत-जात असतांना काय उपाय योजना करावी, याची सखोल माहिती दिली. दरम्यान या शिबिरात कोणासही कोविड-१९ या आजाराचे लक्षणं दिसुन आलेले नाही.
------------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines