अमळनेर - सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतांनाही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी नपाचे सफाई कर्मचारी आपापल्या नेमणुकीच्या जागी नियमित साफसफाई करत असतात. या संकटकाळातही नपाने शहराच्या स्वच्छता व सफाई कामात मोठे योगदान दिले आहे. सिंधी कॉलनीत नेमणूक असलेल्या सफाई कामगारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील जय शंकर आश्रम शिव मंदिर येथे बाबा सदोरामल यांच्या पुण्यतिथीनिमित्त सैनानी परिवाराच्या वतीने सफाई कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. या सफाई पथकाचे मुकादम अनिल बेंडवाल व सर्व सफाई कर्मचा-यांचा दौलतराम सैनानी,माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी,प्रेम सैनानी,किशन सैनानी,दिनेश सैनानी,मुलचंद सैनानी,प्रितम सैनानी यांनी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नागरिकांनी केलेल्या या अनपेक्षित सत्कारामुळे कर्मचा-यांना सुखद धक्का बसला.
No comments
Post a Comment