भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे अनंतात विलीन शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल आत्मियता असणारा नेता हरपला - मा.आ.स्मिता वाघ संयमी व मोठा जनसंपर्क असलेला अष्टपैलू नेता ही हरीभाऊंची ओळख - आ.अनिल पाटील

--------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
जळगाव -
जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे काल आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते.तेथेच त्यांचे पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामीण भागाशी नाळ असलेला एक नेता अनंतात विलीन झाला. जिल्हा व राज्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
भाजपाच्या प्रदेश चिटणीस मा.आ.स्मिताताई वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की,राजकिय क्षेत्रात वेळोवेळी हरीभाऊ जावळे यांचे  मार्गदर्शन आम्हाला लाभले.
यावल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर सलग दोनवेळा ते रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. २०१४ मध्ये  पुन्हा त्यांनी रावेर मतदार संघातून विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले. शिवाय, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केल्याने त्यांना राज्याच्या कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली कृषी विज्ञान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती.शेती,पाणी,सिंचन व शेतकरी  याबद्दल आत्मियता असलेला एक कर्तबगार नेता भाजपाने गमावला आहे.त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळ निर्माण झाली आहे.त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.हरिभाऊ यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
--------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.