आ.अनिल पाटील यांच्या निधीतून कोरोना संरक्षक साहित्य दाखल तालुका आरोग्य विभागाकडे केले साहित्याचे हस्तांतरण

-------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर -
विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या निधीतून कोरोनावरील उपचारासाठीचे संरक्षक साहित्य बुधवारी येथे दाखल झाले. 
      आमदार अनिल पाटील यांनी या वस्तूंचे हस्तांतरण यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांचेकडे करण्यात आले. 
प्रा.आ.केद्रास दिले साहित्य
       आमदार निधीतील पहिल्या टप्प्याचे साहित्य दाखल झाले आहे. यात पाच आरोग्य केंद्रांसाठी हे साहित्य असून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ढेकू,जानवे,मांडळ,पातोंडा, मारवड यांना हे साहित्य त्वरीत डॉ.गिरीश गोसावी,डॉ.अतुल चौधरी,धनराज सोनवणे,किशोर माळी, कल्पना गायकवाड, कमलेश बडगुजर आदींनी मोजून दिले.
या साहित्याची झाली उपलब्धता
             तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांना कोरोनावरील उपचारासाठी आमदार निधीतून खालील साहित्य उपलब्ध झाले आहे. 
हायपोक्लोराईड ५ लिटर १
लेअर मास्क -४०००
कफ सिरफ बब ४०००हजार 
पीपीई किट - १०
सॅनिटायझर - ५०० मिली २००
सलाईन स्टँड -  ४
थर्मो स्कॅनर -  १
टॅमि फ्लू सिरप - ३
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.