लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा युवक कार्यकर्त्यांचे तहसिलदारांना निवेदन

----------------------------------------------------------------------
             -* जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर -
  कोरोना या विषाणूने देशावर मोठे संकट आले आहे.हा आजार रोखण्यासाठी देशात सर्वत्र तब्बल तीन महिने लॉकडाऊन लागू  झाले.  त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. त्यामुळे नोकऱ्या गेल्या, बेरोजगारीचे संकट ओढवले. त्यात मंदी आली सर्व उद्योगधंदे बंद पडलीत.अत्यावश्यक सेवेत फक्त किराणा भाजीपाला,दुध,दवाखाने मेडिकल्स् वगळता संपुर्ण व्यवहार बंद झाले त्यामुळे काम मिळेनासे झाले. यामध्ये सलुन ब्यूटी पार्लर व ऑटो रिक्षा, खाजगी वाहने, वाजंत्री, सराफ ज्वेलरी, हॉटेल किरकोळ विक्रेते किरकोळ खाद्य विक्रेते उध्वस्त झाले. यातून सावरायला वेळ लागेल,मात्र हाती पैसा नाही. लॉकडाऊनचा फटका शेतकरी,
शेतमजुर व्यापारी यांना सुध्दा मोठ्या प्रमाणावर बसला आहे.  शेतकऱ्यांनी माल जसा वेळ मिळेल तसा विकला. या परिस्थितीत शहरातील नागरिक व शेतकरी,कामगार वर्ग यांना सरकारने दिलासा द्यावा व या काळातील सर्व नागरिकांचे विज बिल १०० युनिट पर्यंत माफ करावे अशी मागणी तहसीलदार वाघ यांच्याकडे केली. सदर निवेदनात असे म्हटले आहे की अमळनेर शहर व तालुक्यात कोरोनाचे भयंकर संकट आहे. त्या परिस्थितीमध्ये फटका बसलेल्या शहरातील सर्व व्यावसायिकांना शासनाने लोकांच्या हिताचा विचार करुन निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. निवेदन देतांना गोविंदा बावीस्कर,भुषण भदाने,सुनिल शिंपी,सनी गायकवाड,गणेश पाटिल हे उपस्थित होते.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.