गांधलीपुरा रस्त्याचा अतिक्रमणाचा फास झाला मोकळा वाहतुकीची कोंडी होत असल्याची नागरिकांची होती तक्रार रस्ता वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई

-----------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
कुलर सेल.   सेल कुलर.  कुलर सेल
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
  शहराच्या अंतर्गत भागातून जाणा-या मुख्य रस्त्यावरील रहदारीस अडथळा ठरणारे गांधलीपुरा पोलीस चौकी पुढील अतिक्रमणे आज 
नगर पालिकेने काढली. नुकतीच काही दिवसापूर्वी दगडी दरवाज्या समोरील अत्यंत अडचण असणारे अतिक्रमण काढण्यात आले होते. तर आज गेल्या अनेक वर्षापासून गांधलीपुरा पोलीस चौकीच्या पुढे असलेल्या मुख्य रस्त्यावर दुकाने,इमारती बांधून रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे पालिकेने मोजमाप करून काढली. 
थेट रस्त्यावर अतिक्रमण
           नगर पालिकेने बांधलेल्या   गटारीचीही पर्वा न करता थेट रस्त्यावर घरे बांधून, दुकाने थाटणा-यांवर आज पालिकेने सकाळीच धडक कारवाई केली. याठिकाणी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी भेट दिली पहाणी केली.
वाहतुकीचा पर्यायी मार्ग
      पालिकेच्या नियमांचे कुठेही पालन होत नसून दगडी दरवाजा ढासळल्याने त्या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली असतांनाही या ठिकाणावरील नागरिक अतिक्रमणे काढण्यास तयार नव्हते.तर ये - जा करणाऱ्या वाहतुकीची दररोज  कोंडी होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या.शेवटी रस्ता  मोठा करावा लागणार होता.  त्याकरिता माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेत आज या अतिक्रमण धारकांशी बोलून त्यांच्याच उपस्थितीत अतिक्रमणे काढली. यासाठी पालिकेने २ जे सी बी मशिन व अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल,सोमचंद संदानशिव यांच्या अतिक्रमण हटाव टीमच्या सहाय्याने अतिक्रमण  काढण्यात
आले.
रस्ता दुभाजक कामास सुरुवात
            अतिक्रमण काढून रस्ता मोकळा झाल्यानंतर नगर  पालिकेचे बांधकाम अभियंता संजय पाटील,कारकून मिलिंद चौधरी,हरीश पाटील यांनी रस्त्याचे मोजमाप करुन दुभाजकांची आखणीही केली.दुभाजकाचे काम तात्काळ सुरू होणार आहे.  
              शहरातील अतिक्रमण काढण्याच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस ताफाही या ठिकाणी उपस्थित होता.
अन् श्वास झाला मोकळा
          गेल्या अनेक वर्षांपासून ही अतिक्रमणे वाढतच होती. प्रत्येक जण जणू काही रस्त्यावर येण्याची  एकमेकांशी स्पर्धा करत  असल्याची प्रचिती येत होती.या सर्व अतिक्रमण धारकांना सुमारे  ३० वर्ष झाली असावी. पण ते अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. शेवटी अतिक्रमण काढणे,पर्यायी वाहतुकीला न्याय देणे हीकाळाची गरज असल्याने परिवर्तन हा संसाराचा नियम असल्याचे  सर्वानी लक्षात घेता ही
अतिक्रमणे निघून रस्ता मोठा झाला आणि कोंडी होत असलेला रस्ता मोकळा झाला.

माजी आमदारांचे कौतुक
     या रस्त्यावरून जात असतांना अनेक नागरिकांनी ही कारवाई होतांना पाहिली. गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे असलेल्या रस्त्याचे अखेर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून परिवर्तन झाले हे बघता काही  नागरिकांनी थांबून मा.आ.साहेबराव दादा पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.
---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.