डीवायएसपींच्या अपघाताची माहिती मिळताच आ.अनिल पाटील पोहोचले चांदवडला स्व.राजेंद्र ससाणेंच्या कुटुंबियांचे केले सांत्वन,घटनेची घेतली माहिती अधिकारी व कर्मचा-यांनी प्रवासात काळजी घ्यावी - आ.अनिल पाटील



------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना युद्धात सहभागी असणारे अमळनेर उपविभागाचे डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांच्या अपघाती निधनाची माहिती अमळनेरचे आ. अनिल पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ चांदवडचे रुग्णालयात धाव घेऊन स्व.ससाणे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
            आ.अनिल पाटील यांनी पोलीस दलातील एक चांगला अधिकारी गमावल्याचे दुःख व्यक्त करून स्व.ससाणे यांनी अमळनेर येथे डीवायएसपी असतांना कोरोना युद्धात जनतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान समस्त अमळनेरकर कायम स्मरणात ठेवतील अशी भावना व्यक्त केली.यावेळी अपघात कसा घडला याबाबत परिपूर्ण माहिती देखील उपस्थितांकडून जाणून घेतली व तेथे उपस्थित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना धीर देखील दिला.
अधिकारी व कर्मचा-यांनी काळजी घ्यावी
      अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी या कोरोना युद्धात अनेक महिन्यापासून आपले घरदार विसरून नेमणूक असलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. या दरम्यान    कधीतरी दोन दिवस रजा काढून कुटुंबाच्या काळजीपोटी ते जात असतात. यासाठी प्रवास करावा लागतो मात्र,दुर्देवाने ही घटना प्रवासातच घडली असल्याने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रवासात काळजी घ्यावी. 
          *-आ.अनिल पाटील*
                अमळनेर,जि.जळगाव
----------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.