शिवशक्ती चौक भागात रूग्ण आढळला, नपाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त प्रभागाच्या नगरसेविका सौ. कल्पना चौधरी यांनी प्रतिबंधात्मक गोळयांचे केले वाटप प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत पंकज चौधरी यांनी व्यक्त केली नाराजी

--------------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
----------------------------------------------------------------------------
अमळनेर-
येथील शिवशक्ती चौक भागात दि.२७ मे पासून कोरोना आजाराचा रुग्ण सापडून देखील नपाने कुठलीही विशेष खबरदारी न घेतल्याने नागरिकांत  संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने शासनाकडून उपलब्ध आर्सेनीक अल्बम ३० या गोळ्या देखील वाटण्याची तसदी घेतली नाही.
नगरसेविकांच्या प्रयत्नांतून गोळयांचे वाटप
    शेवटी प्रभागाच्या नगरसेविका सौ. कल्पना चौधरी यांच्या मार्गदर्शनात माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकजभाऊ चौधरी यांनी स्वखर्चाने नुकतेच परिसरातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या वाटपाला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात दोन दिवसात वाटप करण्यात आल्याचे पंकज चौधरी यांनी सांगितले आहे.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार
      ज्या प्रभागात/परिसरात रुग्ण अजून पर्यंत आढळले नाही तिथे तहसिलदार सोयी पुरवण्याबाबत  फोटो टाकून प्रसिद्धी मिळवत आहे व जिथे रुग्ण आढळत आहेत तिथे ढुंकून ही पाहायला तयार नाहीत. तसेच शिवशक्ती चौक मागील भाग (कोष्टी वाडा) परिसरात तर जिथे रुग्ण आढळला आहे तिथे प्रशासनाने फक्त घराचे फोटो काढून नेले त्या भागाला ना सील केलं ना फवारणी केली यातून प्रशासन किती गंभीर आहे हे दिसत असल्याचे मत पंकज चौधरी यांनी व्यक्त केले आहे. सुरू असलेल्या ढिसाळ कारभार विषयी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना या बाबत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
 
मा.आ. चौधरी यांच्या कडून परिसरात फवारणी-नागरिकांनी मानले आभार
         माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी स्वखर्चाने २ वेळेस परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केल्याने नगरसेविका सौ कल्पना चौधरी व पंकज चौधरी यांनी व नागरिकांनी  शिरिषदादा चौधरींचे आभार मानले आहेत. परिसरात तज्ञ होमियोपॅथिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने  स्वयंसेवकांच्या सहाय्याने सदर गोळ्या वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.
------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.