कोरोना योद्ध्यांना खान्देशी कलाकारांचे चित्रगीतातून अभिवादन प्रदर्शित होताच २४ तासात ओलांडला हजार दर्शकांचा टप्पा


-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
अमळनेर -
जगातील हॉलिवूड व बॉलिवुडच्या धर्तीवर खान्देशात   खान्देशवूड असावे या भूमिकेतून अस्सल खान्देशी कलाकारांनी  शॉर्ट क्लिप क्रिएशन द्वारे कोरोनाशी लढणाऱ्या  योद्ध्यांसाठी आणि घरात राहून साथ देणाऱ्या प्रत्येकास खान्देशातील कलाकारांचे अभिवादन असलेली 'लढवय्या मी महाराष्ट्राचा' ही गीत असलेली ध्वनीचित्रफीत कालच दि.१ जून रोजी समाज माध्यमात प्रदर्शित झाली. अवघ्या २४ तासात ही कलाकृती एक हजारपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिली व आपली पसंती नोंदविली असल्याची माहिती दिनेश राठोड (चाळीसगांव) यांनी दिली आहे. यात अमळनेरचे जेष्ठ नाट्य व चित्रपट कलावंत प्रा.डॉ. विनय जोशी सरांसह खान्देशातील अनेक कलाकारांचे योगदान आहे
           कोरोना वायरस नावाच्या आजारामुळे मानव जातीचे रक्षण करणाऱ्या भारतातील सर्व जागरूक यंत्रणेला व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, पोलिस,सफाई कर्मचारी,सर्व सरकारी अधिकारी,कर्मचारी, 
सेवाभावी प्रतिष्ठान, कष्टकरी, सेवेकरी सर्वांच्या कौतुकास्पद कामगिरीला प्रोत्साहन  देण्यासाठी व पाठिंबा दर्शविण्यासाठी खान्देशातील प्रसिद्ध कलावंतांच्या सदर ध्वनीचित्रफीतीची मूळ संकल्पना  दिनेश राठोड, मनोहर खैरनार यांची असुन निलेश गढरी यांनी संकलन केलं आहे.
या कलावंताचा सहभाग
          सदर ध्वनीचित्रफीतीत
दिनेश राठोड, सचिन कुमावत, मनोहर खैरनार, निलेश गढरी, निलेश जाधव, मृणाल गायकवाड, एकनाथ गोफणे, चंद्रकांत देशमुख, दीपिका पाटे, कुणाल राऊळ, अभिलाष जोशी, हर्षल मराठे, राज पाटील, निकिता देवरे, पूर्वा देवरे, विशू बिऱ्हाडे, स्वयम् खैरनार, भटू चौधरी, माधवी छाईलकर, पूनम बेडसे, जागृती गोसावी, आदेश लांडगे, प्रा.डॉ.विनय जोशी, बाबुलाल पाटील, विकास सेन, हेमंत कोतवाल, हेमंत चौधरी, अमोल कर्णकार, प्रशांत महाजन, प्राजक्ता कोल्हटकर आदी खान्देशातील कलाकारांनी सहभाग घेतला आहे.

             कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी  खान्देशातील कलाकारांचा मानाचा मुजरा असलेली ध्वनीचित्रफीत दि. १ जून रोजी   short Clip Creation या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या कलाकृतीस दर्शकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एक दिवसातच हजारपेक्षा अधिक दर्शकांनी पाहिली व आपला अभिप्राय दिला आहे.     या ध्वनीफितीत खान्देशातील नंदूरबार,धुळे व जळगाव जिल्ह्यातील कलाकार सहभागी आहेत. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा. 
  *-दिनेश राठोड* चाळीसगाव
-------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.