तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करा भारत सरकारच्या केंद्रीय पथकाकडे रासपच्या नेत्या ज्योती भोई यांची निवेदनाद्वारे मागणी


--------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-----------------------------------------------------------
अमळनेर -
  तालुक्यातील  कोव्हीड-१९ या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात शासकीय अधिकारी अपयशी ठरले असून त्यांची  चौकशी करून कारवाई  करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांनी भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य पथकाकडे केली आहे.
             जळगांव जिल्हयातील   कोव्हीड-१९ या रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावरील उपाय योजना यांची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाने अमळनेर येथेही भेट देऊन पाहणी केली. यावेळी ज्योती भोई यांनी पथकाची भेट घेतली व निवेदन दिले. जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची ही पहिलीच भेट असल्याने ज्योती भोई यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
          अमळनेरमधील वाढलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ज्योती भोई यांनी दिला आहे.
-----------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.