अमळनेर - येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचे आज सकाळी चांदवड जवळील वडाळी भोई जवळ रस्ता अपघातात दुर्दैवी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.
सुटी निमित्त २ दिवस घरी जात असतांना वडाळी भोई गावा जवळ १५० फूट दरीत त्यांची गाडी कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ओळखीच्या इसमाने अमळनेर येथील गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह यांना घटनेची माहिती दिली.
अत्यंत सालस,मनमिळाऊ व मितभाषी स्वभाव असलेल्या अधिका-याचा अकस्मात मृत्यू झाल्याने प्रशासनात व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
अमळनेर हेडलाइन्स परिवारातर्फे स्व.राजेंद्र ससाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
No comments
Post a Comment