------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील निंभोरा येथील एक अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गावातीलच संशयित युवकाविरूध्द मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, निभोंरा गावातील एक अल्पवयीन मुलगी दि.२९ मे रोजी दुपारी ३ वाजता संडासला जाते असे सांगुन तिच्या आजीच्या घरातुन निघून गेली.नातेवाईकांनी तिचा शोध घेतला पण ती मिळून न आल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे जन्म तारखेबाबत आधार कार्ड, शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट व ग्राम पंचायत दाखला यात तफावत असल्याने ग्राम पंचायतीकडे खात्री करता त्यांनी रेकाॅर्ड पडताळून ती मुलगी अल्पवयीन असल्याबाबत कागदपत्र दिल्याने व ती आज पावेतो घरी परत आली नाही, तसेच गावातील मुलगा खुशाल राजेंद्र पारधी हा सुध्दा नमूद दिनांकापासून गावात नसल्याने त्याचेवर संशय व्यक्त करून मारवड पोलीस स्टेशनला गुरनं.३६/२० भादंवि क्र.३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला यांचे मार्गदर्शनाखली सफौ संतोष पवार, सफौ किशोर पाटील, पोलीस नाईक अगोणे, पोलीस नाईक होळकर,पोलीस नाईक कुलकर्णी, पोलीस शिपाई तेली हे पुढील तपास करीत आहेत.




