बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची तालुका कार्यकारणी गठीत तालुका अध्यक्षपदी अशोक मोरे यांची निवड

अमळनेर - 
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची नूतन तालुका कार्यकारीणी नुकतीच  गठीत करण्यात आली. रविवार दि. ७ जून रोजी शहरातील प्रबुद्ध विहारात वरिष्ठ कार्यकर्ते अशोक बिऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल अंतर राखून राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.त्यात उपस्थितांमधून बहुमताने बौधाचार्य अशोक मोरे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर संघटनेच्या कार्याध्यक्षपदी प्रा. सुनील वाघमारे, उपाध्यक्ष म्हणून योगीराज संदानशीव,हर्षल सोनवणे, सचिवपदी सुनील करंदीकर सर, उपसचिव अजय भामरे, कोषाध्यक्षपदी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विमलताई मैराळे व सदस्य म्हणून आनंद बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल समाज  बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
     या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विजय गाढे, कमलाकर संदानशीव, बौधाचार्य सिद्धार्थ सोनवणे, अरुण घोलप, धीरज ब्रम्हे, मिलिंद निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.