शनिपेठ,ताडेपूरा भागात चेकर टाईल्स बसविण्याच्या कामास प्रारंभ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नांतून कामास मंजुरी

--------------------------------------------------------------------
            - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर -
येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्र. २ मधील  शनिपेठ,पैलाड,ताडेपुरा भागात प्रभागांतर्गत रस्त्यावर चेकर टाईल्स बसविण्याच्या कामास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.या प्रभागातील नगरसेवक सुरेश आत्माराम पाटील यांच्या प्रयत्नातून या कामास मंजुरी मिळाली आहे. परिसरातील  गल्लीमध्ये चेकर बसविण्याचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष काम सुरू असतांना नगरसेवक सुरेश पाटील  यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी दिपक प्रजापती, नाना मिस्तरी, विशाल पाटील हे उपस्थित होते. प्रभागातील  नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून नगरसेवक सुरेश पाटील यांचे आभार मानले आहेत.
------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.