नपाच्या माध्यमातून दगडी दरवाजाची दुरूस्ती व सुशोभिकरण करा - पुरातत्व विभागाच्या सहा.संचालक आरती आळे नपाने तातडीने प्रस्ताव द्यावा व पुढील कार्यवाही करावी - बैठकीत झाली चर्चा दगडी दरवाजा दुरूस्ती व रस्त्याचे कामही मार्गी लागणार

----------------------------------------------------------------
          - * जाहीरात * - 
अमळनेर -
शहराच्या प्राचीनतेची साक्ष देणारा अमळनेर येथील दगडी दरवाजा खरोखर अतिशय जीर्ण झाला असून नगर परिषदेने ताबडतोब प्रस्ताव पाठवून सदर वास्तू नपाने  ताब्यात घेऊन त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे अशा सूचना पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळे यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिल्या 
दरवाजाची पाहणी - दुरूस्तीस मंजुरी
  
    वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या आणि जीर्ण झाल्यामुळे व बुरुज कोसळल्यामुळे दगडी दरवाज्याचा विषय लवकर मार्गी लागावा म्हणून नागरिकांनी आमदार अनिल पाटील तसेच नगरपलिकेकडे मागणी लावून धरली होती.  परिस्थिती अतिशय  गंभीर आणि पुरातत्व विभागाची अडचण,निधीची तरतूद नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. कोणत्याही क्षणी बुरुज पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पुढाकार घेऊन नगरपलिकेकडे हस्तांतर करून त्याचे जतन व सुशोभीकरणाची तयारी दर्शविली होती. आमदार अनिल पाटील यांनी सांस्कृतिक मंत्रालयात पाठपुरावा करून संगोपन योजनेंतर्गत १० वर्षासाठी नगरपलिकेकडे  दरवाजा सोपवण्याची परवानगी मिळवली. सदर मंजुरीचे पत्र देण्यासाठी आणि प्रत्यक्ष दरवाजाची पाहणी करण्यासाठी  सहाय्यक संचालक आरती आळे अमळनेर येथे आल्या होत्या. यावेळी मा.आ. साहेबराव पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड ,पुरातत्व विभागाचे कृष्णा बालपांडे ,अभियंता संजय पाटील ,चेतन सोनार ,संजय चौधरी हे उपस्थित होते. दरवाजामुळे अरूंद झालेला  रस्ता, जिर्णावस्था पाहून त्यांनी तातडीने दुरुस्तीची गरज असल्याचे सांगितले. नपाने त्यास पूर्वीसारखा मजबूत करून त्याच्या सौंदर्यात भर पाडावी आणि वाहतूक सुरक्षित करून अनर्थ टाळावेत यासाठी लगेच प्रस्तावाची मागणी केली आणि मुख्याधिकारींनी करारनामा करून घ्यावा असेही सांगितले.
नपा निधीतून दरवाजा दुरूस्ती
            आमदार पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत  कोरोनामुळे शासनाकडून आर्थिक तरतूद होणे शक्य नसल्याबाबत चर्चा झाली म्हणून तातडीने  पालिकेच्या माध्यमातून हे काम करणे उचित होईल असे ठरले यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील ,एल.टी.पाटील हजर होते
----------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.