===================================
====================================
अमळनेर - येथिल बळीराजा लोकोत्सव समितीतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजा पूजन करण्यात आले.'इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो'या घोषणांनी बळी राजाचे स्मरण करण्याची परंपरा अमळनेरला कायम ठेवली आहे.
दरवर्षी निघणारी बळीराजाची भव्य मिरवणूक कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली होती. मात्र शहरातील बळीराजा स्मारक येथे बळीराजा लोकोत्सव समितीचेकार्यकर्ते,लोकप्रतिनिधी,
विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमत बळीराजाचे पूजन केले.याप्रसंगी आ.अनिल भाईदास पाटिल यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.तर उपस्थित जेष्ठ कार्यकर्ते मनोहर पाटिल,सौ.वसुंधरा लांडगे,नगरसेवक श्याम पाटिल,सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा.लिलाधर पाटिल,मा.नगरसेवक विक्रांत पाटिल,
विनोद कदम, प्रविण पाटिल,नगरसेवक विवेक पाटिल,अॅड.तिलोत्तमा पाटिल, सौ.माधुरी पाटील,सयाजीराव पाटिल,प्रा. विजय गाढे,दिलीप पाटिल,आर. बी.पाटील,प्रशांत निकम,एस.एन. पाटील,दशरथ लांडगे,जेष्ठ कार्यकर्ते जयवंतराव पाटील,गहिनीनाथ पाटील,महेश पाटील,आबा चौधरी,महेश चौधरी,पत्रकार गौतम बिऱ्हाडे,भोसले बाबा,रविंद्र पाटील,
ज्ञानेश्वर पाटील आदिंनी पुष्प अर्पण करून बळीराजाचे स्मरण केले.
शिरूड नाका परिसर
शिरूड नाका परिसर येथेही सालाबादप्रमाणे बळीराजा प्रतिमेचे पूजन स्थानिक रहिवाशांनी केले.आ.अनिल भाईदास पाटिल हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.जय अंबे मित्र मंडळ यांनी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.



मुडी प्र.डा.
मुडी येथेही बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन प्रगतिशील जेष्ठ शेतकरी हिम्मतराव झुलाल पाटिल करण्यात आले.कार्यक्रम अध्यक्षपदी भानुदास दंगल पाटिल,ग्रा.प. सदस्य उदय सोनवणे,नारायण पाटिल, धुळे ग्राहक मंचचे अध्यक्ष डॉ.योगेश सुर्यवंशी,विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, महेंद्र पाटील,गुणवंत पाटील,गुलाबराव पाटील, देविदास पाटिल,आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन संजीव पाटील आभार गुणवंत पाटील यांनी केले.किरण पाटील,विनोद पाटील,रामचंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी कु.अंकिता पाटील हिचा सत्कार करण्यात आला.ज्ञानेश्वर पाटील,जयेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
No comments
Post a Comment