अमळनेर - येथील गुरूनानक नगर,सिंधी कॉलनीतील रहिवासी महेशकुमार (बंटी) गुलाबचंद आहूजा यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज दि.८ जुलै रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्यावर जळगाव येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता अमळनेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अंत्ययात्रा गुरूनानक नगर,सिंधी कॉलनी,चोपडा रोड,अमळनेर या त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ, बहिण असा परिवार आहे. ते येथील नपाचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गुलाबचंद आहुजा व अमळनेर नपाच्या माजी नगरसेविका कृष्णाबाई आहुजा यांचे सुपूत्र होत.
तर जळगाव येथील अमरलाल,राजेश (राजूभाई),शामलाल,मुकेश व चेतन (जेकी) व चुघ परिवाराचे भाचे होत.
अत्यंत मितभाषी व मनमिळाऊ स्वभावाचे बंटी आहुजा यांच्या निधनाबद्दल समाज बांधवांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांचा खुप मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अचानक निधनाने मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आहुजा परिवारावर कोसळलेल्या या दुःखात परमेश्वर त्यांना दुःख सहन करण्याची शक्ति देवो. स्व.बंटी आहुजा यास चिरशांती प्रदान करो ही प्रभू चरणी प्रार्थना.
अमळनेर हेडलाइन्स न्युज व बठेजा परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐🙏🙏🙏💐💐
No comments
Post a Comment