°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अमळनेर- सिंधी व शिख समाजाचे आराध्य दैवत गुरूनानक देव यांचा ५५१ वा जयंती महोत्सव काल अमळनेर शहरात धुमधडाक्यात व अतिशय हर्षोल्हासपूर्ण,भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.सिंधी कॉलनी व शहरातील तोलाणी मार्केट या दोन्ही ठिकाणी यानिमित्ताने प्रभातफेरी,किर्तन,सत्संग, मिरवणूक,लंगर महाप्रसाद,फटाक्यांची आतिशबाजी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

येथील श्री गुरूनानक नगर (सिंधी कॉलनी) येथे सकाळी ५ वाजता संत हासाराम दरबार येथून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीच्या समारोपानंतर केशरी दुध व अल्पोपहार प्रसादसेवा करण्यात आली.
भाई विशनदास दरबार येथून सकाळी ९:३० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणूकीत सिंधी व सिख समाज बांधव,महिला,युवा मित्र मंडळ उत्साहाने सहभागी झाले होते. गुरूनानक देव यांचा चित्ररथ सजविण्यात आला होता. मिरवणूकीनंतर दुपारी लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजता संत बाबा थाहिरियासिंग दरबार येथे ५५१ पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला व अल्पोपहार वाटप करण्यात आला.


रात्री ९ वाजता संत हासाराम दरबार येथे किर्तन संपन्न झाले.

रात्री ११ वाजता भोगसाहेब व त्यानंतर रात्री १:२० वाजता गुरूनानक देव जन्मोत्सव फटाक्यांच्या भव्य आतिशबाजीत व केक कापून साजरा करण्यात आला.


रात्री ११ वाजता भोगसाहेब व त्यानंतर रात्री १:२० वाजता गुरूनानक देव जन्मोत्सव फटाक्यांच्या भव्य आतिशबाजीत व केक कापून साजरा करण्यात आला.
त्याचप्रमाणे शहरातील सिंधी हौसिंग सोसायटी (तोलाणी मार्केट)मधील भाई लुधडासिंग दरबार गुरूद्वारा येथे सायंकाळी ५ वाजता सत्संग कार्यक्रम संपन्न झाला. सिंधी कॉलनी व शहरात धुमधडाक्यात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भाईसाहेब घनश्यामदास तोलाणी,जितुुु भाईसाहेब,हरी भाईसाहेब,प्रदीप भाईसाहेब,गोपीचंद महाराज,संजय महाराज,किशन महाराज,रोहीत बठेजा,अजितसिंग लुल्ला,कृपालसिंग लुल्ला, दिनेशसिंग लुल्ला,नारायण तोलाणी,स्वोमी तोलाणी,कृष्णा तोलाणी,घनश्याम थदानी,सुमित तोलाणी जितेंद्र डिंगराई,कर्तारसिंग,बलवंतसिंग लुल्ला,संजय बितराई,प्रकाश जग्यानी,रविंद्रसिंग लुल्ला,विजय अंदानी (छोटु)आदींसह
पू.जनरल सिंधी पंचायत व शहर पंचायत व सिंधी समाज मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments
Post a Comment