वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार अनिल पाटील ठरले लोकनेते शुभेच्छाचा पडला पाऊस, वृक्षारोपण,रक्तदान,लाडू वाटप व आरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन

Wednesday, July 7, 2021

/ by Amalner Headlines


-----------------------------------------------------
- * जाहीरात * -
--------------------------------------------------------
अमळनेर - येथील विधानसभा मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार भाईदास अनिल पाटील यांचा आज दि.७ जुलै रोजी संपन्न झालेला वाढदिवस न भूतो न भविष्यती असा साजरा होऊन सर्वपक्षीय मान्यवर,सर्व स्तरातील पदाधिकारी,हितचिंतक,कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी देखील शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडल्याने आमदार अनिल पाटील खऱ्या अर्थाने खान्देशातील लोकनेते ठरल्याचा  प्रत्यय साऱ्यांना आला.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
            वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी सामाजिक व लोकहिताचे कार्यक्रम आयोजित केले होते. प्रामुख्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल येथे आयोजित नेत्ररोग तपासणी व मानसोपचार शिबीरास रुग्णांचा मोठा प्रतिसाद लाभला. शहर व ग्रामीण भागातून उपस्थित रुग्णांची नेत्ररोग तज्ञ डॉ.कौस्तुभ वानखेडे व मानसोपचार तज्ञ डॉ. श्रद्धा वानखेडे यांनी तपासणी केली.
         तसेच बस स्थानकावरील शिवभोजन केंद्रात आमदारांच्या हस्ते ५३ किलो लाडू वाटप करण्यात आले,तर बाजार समिती जवळील शिलनाथ शिवभोजन केंद्रात जिलेबी वाटप करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक मंडळ,कर्मचारी वृंद व व्यापारी बांधव यांनी जंगी सत्कार आमदारांचा केला. याशिवाय मार्केट आवारात आमदारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.एका संस्थेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदारांनी स्वतः रक्तदान केले,संचिन खंडारे मित्र परिवाराने अल्पोहार व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली,राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष दिनेश कोठारी व देविदास देसले यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त एका गरीब होतकरु मुलास सायकल भेट दिली, तर शहरातील वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांनी आ.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ आयोजित केला होता. आ.पाटील यांनी या ठिकाणी भेटी देऊन सत्कार स्विकारला व केक कापून त्या परिसरातील तरूण कार्यकर्त्यांसह वाढदिवस साजरा केला. यापद्धतीने दिवसभर लोकहिताचे कार्यक्रम सुरू होते,सायंकाळी माजी नगरसेवक राजू फाफोरेकर व कल्पनेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने ढेकू रोडवर हरिओम नगरात आमदारांच्या हस्ते मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

शुभेच्छांचा पाऊस
           राज्य पातळीवरील मंत्री महोदय व नेते मंडळी तसेच जिल्हा भरातील नेते मंडळी,सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आदींनी भ्रमणध्वनी द्वारे आमदारांना शुभेच्छा दिल्या.प्रामुख्याने संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावाचे पदाधिकारी सर्व समाजाचे पंच मंडळ सदस्य आदींनी आमदारांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.
आमदार पाटील यांनी कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य आणि अश्या कठीण परिस्थितीत देखील मार्गी लावलेली विकासकामे यामुळेच आमदार अनिल पाटलांचा वाढदिवस यंदा जंगी झाला,हितचिंतक, कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांनी शहरभर आमदारांच्या शुभेच्छांचे फलक झळकविल्याने या फलकांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
---------------------------------------------------------------

अमळनेर विधानसभा मतदार संघाचे भुमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची अमळनेर हेडलाइन्स न्युज चे उपसंपादक रोहित बठेजा यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines