-------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील पोलिस स्टेशनचा प्रभार सध्या धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असलेले जयपाल माणिकराव हिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आज जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अंबादास मोरे यांची दोन महिन्यांपूर्वी जळगाव येथे तडकाफडकी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दिलीप भागवत यांची तात्पुरती बदली करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आज जारी केलेल्या आदेशानुसार श्री जयपाल हिरे यांची अमळनेर येथे तर दिलीप भागवत यांची पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मुक्ताईनगरचे सुरेश शिंदे यांची जळगाव नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील रामकृष्ण पवार यांची मुक्ताईनगर येथे बदली करण्यात आली आहे.
सध्या धरणगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे यांनी या अगोदर अडावद,मेहुणबारे,धरणगांव येथे सेवा बजावली आहे. आपल्या डॅशिंग कार्यशैलीने त्यांनी गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे.त्यानी आज आपल्या पदभार स्विकारला आहेत.

