---------------------------------------------------------------------
अमळनेर - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची अमळनेर शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष पंकज भोई यांनी आज घोषित केली.यात ७ उपाध्यक्ष, २सरचिटणीस,८ चिटणीस,२ प्रसिद्ध प्रमुख,१ सोशल मीडिया प्रमुख असून ५१ कार्यकारिणी सदस्य असे एकूण ७१ युवक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून असलेल्या युवा मोर्चाची कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष पंकज भोई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. यात *उपाध्यक्ष* - गौरव अशोक महाजन,शुभम प्रदीप पाटील,सुमित बापू हिंदुजा,गौरव कैलास सोनार,कमलेश जयंतीलाल वानखेडे,राजगुरू महाजन,समाधान वसंत केदार *सरचिटणीस*- राहुल चौधरी,
समाधान पाटील, *चिटणीस* - नितीन रामकृष्ण पवार,गजानन जगन्नाथ पाटील,अशोक भगवान पाटील,भूषण नानाजी पाटील,शुभम अशोक बडगुजर, दिनेश राजू जाधव,शिवकिरण बापू बोरसे,रितेश चिकाटे, *कोषाध्यक्ष* - मुशाईद फैजोदिन शेख, *प्रसिद्ध प्रमुख* - स्वप्नील भारत भावसार, *सहप्रसिद्धी प्रमुख* - सौरभ लोटन पाटील, *सोशल मीडिया प्रमुख* - आकाश डी. माळी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नूतन कार्यकरणीस पुढील वाटचालीसाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.स्मिताताई वाघ,अॅड. ललिताताई पाटील, विधी सेलचे प्रदेश संयोजक अॅड.व्ही.आर.पाटील,जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सरचिटणीस राकेश पाटील, विजय राजपूत,माजी शहरअध्यक्ष शितल देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

