कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या ९३ व्यक्तींवर कारवाई पोलिसांनी केली २३,३०० रुपये दंडाची वसुली, ७ दुकानांना लावले सिल

Sunday, May 23, 2021

/ by Amalner Headlines

--------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शासनाने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्या अनुषंगाने अमळनेर शहरात नगर परिषद व पोलीस विभागाने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर  दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. त्या अंतर्गत आज दि. २३ मे रोजी ९३ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली तर ७ दुकाने सिल करण्यात आली.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड,७ दुकानांना सिल
             अमळनेर शहरात आज दि.२३ मे २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. त्यात प्रामुख्याने १४८ व्यक्तींची ॲन्टीजेन टेस्ट केली असता ०४ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आल्या.पोलीस व नगरपालिका यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एका दुकानास २००० रुपये प्रमाणे, एका दुकानात १००० रुपये प्रमाणे असा एकूण ३०००/- रुपये दंड तर ०७ दुकाने सिल करण्यात आली आहेत. M act ई चलन प्रमाणे ८ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, ०२ व्यक्तीवर ७०० रुपये प्रमाणे आणि ०८ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ७०००/- दंड करण्यात आला.विना हेल्मेट फिरणा-या ०४ व्यक्तींवर ऑनलाईन पध्दतीने कारवाई करण्यात आली.
रस्त्यावर फिरणा-यांना दंड
           शहरातील पैलाड चौक येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे ४१ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे, ०३ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे असा एकूण ९७००/- रूपये दंड करण्यात आला आहे. तर कलागुरू मंगल कार्यालय येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे ०२ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ४००/- रूपये दंड करण्यात आला आहे.गलवाडे रोड येथील नाकाबंदीत विना कारण फिरणारे १६ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे ३२००/- रूपये दंड करण्यात आला आहे.असा आज रोजी ९३ व्यक्तींवर दंडात्मक व सीलबंद कारवाई करून २३,३००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines