शिरसोदे महाळपुर येथे बोरी नदीवर दोन गेटेड बंधारे,तर पिंपळ भैरव येथे पुलाच्या कामाचे भूमिपूजन

Sunday, May 23, 2021

/ by Amalner Headlines
-----------------------------------------------------------------
                         - * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर - अमळनेर विधानसभा मतदार संघातील शिरसोदे महाळपुर गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी तसेच शेती व सिंचनाकरिता आवश्यक असणारे गेटेड बंधारे नुकतेच लघुसिंचन मंत्रालयाकडून निधी मंजूर करून त्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.  पारोळा तालुक्यातील शिरसोदे महाळपुर गावाजवळ बोरी नदीवर दोन गेटेड बंधारे व पूल आमदार निधीतून मंजूर करून त्या बंधारा व पुलाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तर पिंपळभैरव येथे पावसाळ्यात गावकऱ्यांना पारोळा जाण्यासाठी मार्ग रहात नव्हता. आता पिंपळभैरव येथेही पुलाचे काम मंजूर होऊन कामाला सुरुवात झाल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी मानले आभार
              आमदार अनिल पाटील यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन बंधाऱ्यांना त्वरित मान्यता मिळवून त्या कामाचे  प्रत्यक्ष भूमिपूजन केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांतर्फे आमदार अनिल पाटील यांचे आभार मानण्यात आले.
यांची होती उपस्थिती
          या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी उपसभापती  चंद्रकांत पाटील,महाळपुरचे सरपंच सुधाकर पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, उपसरपंच शालिक बडगुजर,ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील, राकेश गुरव, दिनेश मोरे, जिजाबराव पाटील, भिकन मालचे, विनोद महाजन, पप्पू मिर्झा, रामकृष्ण पाटील, वाल्मीक पाटील, मच्छिंद्र महाजन, रघुनाथ पाटील, गुलाब सहादू पाटील, अनिल सोनवणे, लोटन चौधरी, अनिल पाटील, महेश पाटील, पंढरीनाथ बागुल, जयकुमार पाटील, अमृत पवार, विनायक पाटील, रमेश गुरुजी, किशोर पाटील, भिकन कांबळे, श्यामदेव भिल, सागर पारधी, धर्मेंद्र पाटील, कैलास पाटील, प्रभाकर पाटील, हिम्मत चौधरी, रघुनाथ पाटील आदी उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines