झन्ना मन्ना जुगारावर पोलीसांचा छापा - ७ मोटरसायकलीसह ३ लाख ७ हजाराचा मुद्देमाल जप्त

अमळनेर -
शहराबाहेर धार रस्त्याजवळ असलेल्या बल्ल्या हनुमान टेकडी जवळ आज दुपारी काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकासह मारलेल्या छाप्यात ८ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई
          दिनांक २६ मे २०२१ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास बल्ल्या हनुमान टेकडीजवळ ८ इसम झना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळताना रोख रुपये व ७ मोटार सायकल असा एकूण ३,०७,१४० रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आले.पो. कॉ. भूषण शिवाजी बविसकर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक  श्री जयपाल हिरे,पोहेकॉ किशोर पाटील,पोना हितेश चिंचोरे, भूषण बाविस्कर ,राहुल पाटील, यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.