----------------------------------------------------------------
अमळनेर - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात आज दिलेला निर्णय अनपेक्षित व निराश करणारा आहे. राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणं धक्कादायक आहे.मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी, ऐतिहासिक संघर्षाला यश मिळेल अशी खात्री होती. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी, मराठा बांधवांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी मला खात्री आहे.
मराठा समाजानं आजवर शांततापूर्ण, संयमी, लोकशाही मार्गानं आपला लढा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही हीच भूमिका कायम ठेवावी. कोरोना संकटकाळात समाज बांधवांचा जीव धोक्यात न घालणं, कोरोनापासून सर्वांच्या जीविताचे रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
No comments
Post a Comment