अमळनेर - कोरोनाबाधित रूग्णांची संख्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दि. १५ मे पर्यंत शासनाने काही निर्बंध जाहीर केले आहेत. या नियमांना अधिक कडक करीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली. तर याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने विविध नियम लागू केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर नपाच्या अतिक्रमण विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आजही काही दुकानदार व नागरिकांवर कारवाई करण्यात आली. काही दुकानदारांना वारंवार सुचना देऊनही त्यांच्याकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा दुकानदारास मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी कडक शब्दात तंबी दिली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
नागरिक व व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे,मास्कचा वापर करणे या नियमाचा आग्रह केला जात आहे. यासह निर्धारित वेळेच्या नंतरही दुकाने सुरू ठेऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आज अमळनेर शहरातील रविंद्र ठाकूर,दादाजी हॉटेल,प्रशांत हॉटेल,मुंबई चौपाटी,शाखील बागवान,न्यु कमल एजन्सीज यांना रूपये २०० पासून रूपये १००० पर्यंत दंड करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड,उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल व कर्मचारी गणेश ब्रम्हे,यश लोहरे,सुरेश चव्हाण,जयदीप गजरे,विशाल सपकाळे,अविनाश बि-हाडे,जगदीश बि-हाडे,बुध्दभूषण चव्हाण आदींनी नियमांचे उल्लंघन करणा-यांना दंड केला आहे. तर वारंवार नियमांचे उल्लंघन करणा-या दुकानास यापुढे पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास कुलूप ठोकण्यात येईल व लॉकडाऊन पूर्ण होईपर्यंत दुकान सुरू करता येणार नाही अशी कडक शब्दात तंबी देण्यात आली आहे.
No comments
Post a Comment