बहादरवाडी ते सडावण रस्त्याच्या दुरुस्तीचा शुभारंभ

-------------------------------------------
                - * जाहीरात * -
--------------------------------------------------------
अमळनेर -
अमळनेर ते पारोळा रस्त्यावरील बहादरवाडी  फाट्यावर दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
                तालुक्यातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या अमळनेर - पारोळा - भडगाव या रस्त्यावर बहादरवाडी ते सडावण या दरम्यान ही दुरुस्ती होत असून गेल्या काही वर्षात त्याची डागडुजी झाली नाही म्हणून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी रा.मा.क्र.१ कि.मी १६८/००
आणि १६९/०० ते १७० ची सुधारणा करणे ता.अमळनेर अंदाजित किंमत रुपये ६७लाख  ९९ हजार ५२१ लक्ष कामाचे भूमिपूजन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या मान्यवरांची होती उपस्थिती
      यावेळी माजी नगरसेवक राजु फाफोरेकर,रढावणचे भैय्यासाहेब पाटील,पंकज पाटील, बहादरवाडीचे रमेश पाटील, रामकृष्ण पाटील,चिंतामण पाटील,भटु पाटील,दिलीप पाटील,ज्ञानेश्वर पाटील,रामकृष्ण विक्रम पाटील खोकरपाटचे भरतसिंग पाटील,उत्तमसिंग पाटील, दिलीप राजपूत सडावणचे अशोक पाटील, मधुकर पाटील, ठेकेदार भगवान महाजन, सा.बां.चे उपअभियंता दिनेश पाटील,शाखा अभियंता सत्यजित गांधलीकर यांच्यासह ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.