शहरात विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई नाकेबंदीच्या 'एन्ट्री' लाच मोठ्या प्रमाणात 'फाईन' आज ७१ व्यक्तींवर कारवाई, १९,७०० रूपयांचा दंड वसुल

Wednesday, May 26, 2021

/ by Amalner Headlines
------------------------------------------------------------------
                              - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------------
अमळनेर - राज्य शासनाने लागू केलेल्या 'ब्रेक द चेन' अंतर्गत जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीसांनी आज ७१ नागरिकांना दंड केला आहे. शहरात प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या नाकेबंदीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून विनाकारण ये - जा करणा-यांवर 'एन्ट्री' लाच 'फाईन' चा तडाखा बसला आहे. आज एकूण १९,७०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन - ऑनलाईन कारवाई
                 अमळनेर शहर हद्दीत आज दि. २६ मे २०२१ रोजी  विविध ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. आज प्रामुख्याने M act ई चलन प्रमाणे ०६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १२ व्यक्तीवर २०० रुपये प्रमाणे आणि ०१ व्यक्तीवर १५०० रुपये प्रमाणे, ०१ व्यक्तिवर १००० प्रमाणे असा एकूण ७९००/- रूपये दंड वसुल करण्यात आला.विना हेल्मेट फिरणारे ०४ व्यक्तींवर ऑनलाईन पध्दतीने कारवाई करण्यात आली. 
शहरात 'एन्ट्री' आणि 'फाईन' चा तडाखा
             धुळे रोडवरील कलागुरू मंगल कार्यालयाजवळ करण्यात आलेल्या नाकेबंदीत विना कारण फिरणारे ६ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे, १६ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे असा एकूण ६२००/- रूपये दंड वसुल करण्यात आला आहे.गलवाडे रोड नाकाबंदीत विना कारण फिरणारे २३ व्यक्तींवर २०० रुपये प्रमाणे, ०२ व्यक्तींवर ५०० रुपये प्रमाणे असा एकूण ५६००/- रूपये दंड वसुल करण्यात आला आहे. असा आज  एकूण ७१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून १९,७००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines