-------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्याच्या ग्रामीण भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या माध्यमिक शाळा शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या आहेत.मात्र शिक्षकांचे लसीकरण अद्यापही रखडलेले आहे. त्यातच तालुक्यात शिक्षक पॉझिटिव्ह सापडल्याने पुन्हा एकदा प्रशासन कामाला लागले असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे यासाठी शिक्षक भारती संघटनेने प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन दिले.काय आहे निवेदनात
शाळा सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने १००% लसीकरण करणे गरजेचे असतांना आजही बहुतांश शिक्षक व शिक्षकेतरांचे लसीकरण झालेले नाही.काही शिक्षकांचा पहिला डोस झाला आहे. मात्र दुसऱ्या डोससाठी वणवण फिरावं लागत आहे.
प्रशासनाने मोहीम राबवून शिक्षकांचे १००% लसीकरण करावे तसेच कोरोना काळात सेवा बजावतांना मृत झालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर यांच्या वारसांना ५० लाखांची मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा व्हावा या मागण्या निवेदनाद्वारे मांडण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील,तालुकाध्यक्ष विशाल वाघ,कार्याध्यक्ष रोहित तेले, उपाध्यक्ष जगदीश पाटील,उमाकांत हिरे,नितीन पाटील,राहुल पाटील,राकेश साळुंखे तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments
Post a Comment