----------------------------------------------------------------
जळगाव - भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे यांची भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी निवड केली आहे. आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता त्यांची प्रदेश सचिव म्हणून निवड झाली आहे.
भैरवी या माजी आमदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व स्व.उदय वाघ यांच्या कन्या असून सौ. जयश्री व अॅड. अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत. भैरवी अपूर्व पलांडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,माजी मंत्री गिरीश महाजन,युवा मोर्चा प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील,विभाग संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुक्यासह जिल्ह्यातूनही अभिनंदन केले जात आहे.
No comments
Post a Comment