अमळनेरात २६ रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराजांचे जाहीर किर्तन अॅड.ललिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन

Thursday, July 22, 2021

/ by Amalner Headlines
------------------------------------------------------------------------
                        - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - येथील जिजाऊ बहुउद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ जुलै २०२१ रोजी ह.भ.प.श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा जाहिर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
'प्रबोधनात्मक कार्यक्रम
     दि.२६ जुलै अॅड.ललिताताई पाटील यांचा वाढदिवस आहे. या निमित्त दरवर्षी अमळनेर करांसाठी शैक्षणिक,सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम संस्थेच्या वतीने आयोजित केले जातात.
     गेल्या दोन वर्षांपासून कोविड - १९ च्या प्रभावाने मानवी जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला कशा प्रकारे सामोरे जावे,कोरोना काळात सामाजिक बांधिलकी कश्या प्रकारे जोपासावी या वैफल्यग्रस्त काळात आपल्या जीवनाचा 'पुनश्च हरिओम' कशा प्रकारे करता येईल यासाठी ह.भ.प श्री इंदुरीकर महाराज यांचे अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. 
'या' ठिकाणी आहे किर्तन
                    या किर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल,चोपडा रोड,अमळनेर येथे सायंकाळी ५  वाजता उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने अॅड.व्ही.आर.पाटील,महेश पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे,शाम अहिरे,प्रफुल्ल पवार, भिकेश पाटील, शितल देशमुख, शरद सोनवणे, जिजाबराव पाटील, श्रीनिवास मोरे,घनश्याम पाटील व आयोजक समितीचे सदस्य,तसेच जिजाऊ बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines