हा तर बारा बलुतेदार समाजाचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा कट सर्व समाजांनी एकत्र येण्याचे आवाहन - अनेक समाज घटकांची बैठकीस उपस्थिती

Sunday, July 4, 2021

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------
                    - * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने  बारा बलूतेदार समाजाचे राजकीय अस्तित्व संपूष्टात आणण्याचे कट कारस्थान प्रस्थापित राजकारण्यांनी केले असून याविरूध्द लढा देण्यासाठी सर्व १२ बलूतेदार व १८ अलूतेदार समाजाने संघटीत व्हावे असे आवाहन संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मूकूंद मेटकर यांनी केले. शहरातील वाडी चौकातील शिंपी समाज मंगल कार्यालयात सर्व १२ बलूतेदार समाज अध्यक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. ओबीसी समाजावर आलेली गदा आहे. आमचे आरक्षण काढण्याची हिंमत होत नाही. ओबीसी समाज ५२ टक्के असतांना हे संकट आलय याला कारण सर्व समाज एकत्रीत आहे बारा बलूतेदार संघटना राजकारणात नाही परंतू  सत्तेकडे नजर ठेवून काम करणार आहे. छत्रपतींचे खरे वारसदार बारा बलूतेदारच आहेत. आज राजकीय आरक्षण काढले गेले भविष्यात आर्थिक आरक्षण काढले जाईल ही बाब भविष्यातील पिढीला नुकसानदायक आहे. सर्व समाज संघटनेचे पदाधिकारी एकत्रीत येवून संघटना बांधणी करावी असे मार्गदर्शनपर आवाहन संघटनेच्या प्रदेश व जिल्हा प्रतिनिधींनी केले. 
महिलांनीही पुढाकार घ्यावा      
                    उत्तर महाराष्ट्र बारा बलूतेदार संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती कूमावत यांनी यासाठी महिलांनी देखील पुढाकार घ्यावा राजकीय आरक्षण गेल्याने आपल्या समाजाला गल्ली ते दिल्लीतील राजकीय पदे मिळणार नाहीत म्हणून संघटीत होण्याचे आवाहन केले. 
             यावेळी किशोर सुर्यवंशी, ईश्वर मोरे, चंद्रशेखर कापडे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्री निकूंभ सरांनी केले. यावेळी आरती शिंपी, छाया कोरडे, सखाराम मोरे,भास्कर जूनागडे,रविंद्र बोरनारे, सूनिल वानखेडे, शहरातील सोनार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार दिपक खोंडे यांचेसह कुंभार, शिंपी,न्हावी,परिट अशा विविध  बारा बलूतेदार समाजाचे प्रतिनिधी उपस्थीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून मोजक्या प्रतिनिधींची प्रातिनिधीक स्वरूपात बैठक पार पडली.
स्थानिक पातळीवर शाखा स्थापना करणार
                    लवकरच स्थानिक पातळीवर महाराष्ट्र बारा बलूतेदार महासंघ अमळनेर तालूका शाखेची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात येवून ओबीसींंच्या प्रश्नावर लढा उभारण्यात येणार आहे.
आज जिल्हा संपर्क अभियान
            जळगांवतर्फे आज संपर्क अभियानात जळगाव जिल्हा अध्यक्ष किशोर सूर्यवंशी, प्रदेश सदस्य श्री ईश्वर मोरे यांचे नेतृत्वात ६ तालुक्यांचा दौरा करण्यात आला.  त्या - त्या तालुक्याच्या न्हावी, धोबी, शिंपी, सोनार, कुंभार, कोष्टी,गुरव, बेलदार, लोहार, सुतार, भोई, चर्मकार या समाजाचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची चाळीसगावला श्री किसनराव जोर्वेकर यांचे निवासस्थानी (टाकळी प्र. चा.) सकाळी ठीक ८-३०वा.,भडगावला सकाळी ११ वा,पाचोरा सकाळी १२ वा. हॉटेल प्रितम,जारगाव चौफुली,पाचोरा,
पारोळ्याला दुपारी ३ ते ४,शिंपी समाज भवन, बालाजी मंदिर रोड येथे तर अमळनेरला दुपारी ५ वा. तर चोपडा येथे सायंकाळी ७ वा. नाभिक समाज मंदिर,उभा मारुती मंदीर जवळ हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक, व शेवटी धरणगावला रात्री ८ वा. संपर्क अभियान बैठकी घेण्यात आल्याची माहिती विभागीय अध्यक्ष मूकूंद मेटकर यांनी दिली.
संपर्क अभियानात यांचा सहभाग
               आज झालेल्या संपर्क अभियानात शिंपी समाज जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रेय कापूरे,रवींद्र बोरनारे, जिल्हा महिला अध्यक्षा भारतीताई कुमावत, शहर अध्यक्षा छायाताई कोरडे, भावसार समाज प्रतिनिधी भास्कर जुनागडे, शहर सचिव आरती शिंपी, अशोक पंडीत आदी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines