बांधकामाचे बिल काढण्याच्या मोबदल्यात अडीच लाख लाचेची मागणी सा.बां. विभागाच्या दोन अधिका-यांविरूध्द गुन्हा दाखल

Tuesday, July 6, 2021

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------------------
                        - * जाहीरात * -


---------------------------------------------------------------------
अमळनेर - आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे झालेल्या बांधकामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराकडून २ लाख ५८ हजार रुपये लाच मागणी केल्याच्या आरोपावरून अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अधिका-यांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे घटना
      याबाबतची अधिक माहिती अशी की,आदिवासी मुलींच्या वसतिगृह बांधकामाचा ठेका नंदुरबार येथील कंपनीने घेतला होता. तर त्या कंपनीकडून धुळे येथील बांधकाम कंपनीने करारनामा करून काम घेतले होते. सदर कामापैकी झालेल्या बांधकामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात  अमळनेर येथील सा.बां.विभागाचे उपविभागीय अभियंता (वर्ग १) दिनेश पाटील यांनी सदर कंपनीच्या कर्मचा-याकडे २ लाख ५८ हजार रुपये इतकी लाच मागणी केली.
त्याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. सदर तक्रारींची दि.८ जून २०२१ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली होती. श्री दिनेश पाटील यांनी स्वतः साठी व त्यांचे सहकारी गांधलीकर यांच्या साठी २ लाख ५८ हजार रुपये अशी मागणी केली. सदर बाबीचे निष्पन्न झाल्याने आज भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 
यांनी केली कारवाई
         लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे,वाचक पोलीस उपअधिक्षक सतिश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक सुनिल कुराडे व पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे ,पोलीस निरीक्षक मंजितसिंह चव्हाण यांच्यासह जयंत साळवे,कैलास जोहरे,शरद काटके,राजन कदम,कृष्णकांत वाडिले,पुरुषोत्तम सोनवणे,संदीप कदम,प्रशांत चौधरी,भुषण खलाणेकर,भुषण शेटे,संतोष पावरा,महेश मोरे,सुधीर मोरे,गायत्री पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरु आहे.
-----------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines